Pune news: नांदेड सिटी आणि शिवणे पुलाजवळील रांजण खळगे कचरा मुक्त

एमपीसी न्यूज-  नांदेड सिटी व शिवणे गाव याला जोडणाऱ्या पुलाच्या मधोमध नदीपत्रात एक भूशास्त्रीय अविष्कार पहायला मिळतो. हे निसर्गाचे ऐतिहासिक भुरुप असून याचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.दुर्दैवाने हा ऐतिहासिक अविष्कार म्हणजेच रांजण खळगे यात प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचा कचरा टाकलेला आढळला होता. महा एनजीओ फेडरेशन आणि टेलस ऑर्गनायझेशनने हे रांजण खळगे ( Pune news) कचरा मुक्त केले.

महा एनजीओ फेडरेशन आणि टेलस ऑर्गनायझेशन तर्फे( Pune news) लोकेश बापट व महा एनजीओ फेडरेशनचे संचालक श्री मुकुंद शिंदे यांनी गेले दोन-तीन दिवस या सर्व भागाची पाहणी प्रत्यक्ष जाऊन केली होती. याकरता मनपा डेप्युटी कमिशनर सौ.आशाजी राऊत आणि डॉ.केतकी घाटगे यांच्याशी संपर्क साधला.आणि तसे पत्र देऊन याच्या संवर्धन स्वच्छते करता कर्मचारी तसेच गाड्यांची मागणी केली.

Pimpri News : संशोधन क्षेत्रात जगामध्ये सर्वाधिक संधी जपानमध्ये  – संदीप पुराणे

आज सकाळी मनपा वारजे व नांदेड सिटीचा क्षेत्रीय कार्यालयातील 40 कर्मचारी, दोन गाड्या. असा मोठा ताफा याकरता कामाला लागला आणि काही तासातच हा निसर्गअविष्कार कचरा मुक्त करण्यात यश आले.  या उपक्रमात मनपा उप आयुक्त आशा राऊत यांचे मोठे सहकार्य आणि नांदेड सिटीचे ॲड. नरसिंहजी लगड आणि पुणे महानगर पालिकेचे माजी आयुक्त सुरेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.त्याबरोबर डॉ.केतकी घाडगे, श्री लाड सर, श्री करकुड , तसेच महा एनजीओफेडरेशनचे संस्थापक शेखरजी मुंदडा यांची  मोठी मदत या कामास मिळाली. पुणे महानगर पालिकेचे ( Pune news) झाकीरजी, नरेन्द्र दीक्षित ,हेमंत पवार, सिद्धार्थ माने हे अधिकारी वर्ग आणि 40 कर्मचारी यांनी मोठी मदत  केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.