Pune news: अन्नपूर्णा प्रकल्प अंतर्गत बुधवारपेठेत पोषण आहार वाटप

एमपीसी न्यूज : मंथन फाउंडेशन, महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीएसआरच्या माध्यमातून शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून बुधवार पेठ , पुणे येथील ९० एचआयव्ही सह जगणाऱ्या महिलांना पोषण आहार वाटप करण्यात आले. 
कृष्णकुमारजी बुब यांनी केलेल्या मदतीमुळे सदर सेवाकार्य सहजरीत्या शक्य झाले. महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने शेखर मुंदडा यांनी क्लीन सायन्स चे आभार मानले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस सहायक आयुक्त सतीश गोवेकर, नवनितजी मानधनी, ससूनच्या डॉ. सुरभी, मंथन फाउंडेशनचे दीपक निकम, संचालक मुकुंद शिंदे, डॉ. चकोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अक्षयमहाराज भोसले यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने भूमिका मांडली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथन फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.