Baramati news: बारामती तालुक्यातील आय.एम.एस.टी कंपनी मध्ये 26 लाख रुपये किंमतीच्या लोखंडाची चोरी करणारे पाच आरोपी मुद्देमालासह अटक

एमपीसी न्यूज: बारामती तालुका हद्दीतील एम.आय.डी.सी येथील आय.एस.एम.टी कंपनीमध्ये 26 लाख रुपये किंमतीच्या लोखंडाची चोरी करणारे सहा आरोपीना मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे.
कैलास लष्कर, आकाश ननवरे वय 21 वर्षे, आशिष लष्कर, वय 20 वर्षे, आकाश जाधव, वय 19 वर्षे, सर्व रा. राक्षेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर, सलमान खान, वय 26 वर्षे, रा. बारामती, जिल्हा पुणे, धर्मेंद्र चौधरी, वय 38 वर्षे, रा. भिगवण, तालुका इंदापूर जिल्हा पुणे, तेजस लोंकलकर उर्फ तेजा शेठ वय 40 वर्षे, रा. तुळजाभवानी नगर जालना या सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे.
4 ऑक्टोबर रोजी संजय मस्तुद, मॅनेजर आय.एस.एम.टी कंपनी एमआयडीसी बारामती जिल्हा पुणे यांनी आय.एस.एम.टी कंपनी मधील सुमारे 26 लाखाचे लोखंडाचे रोल 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर, 2022 रोजीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोट्यांनी तारेच्या कंपाउंड मधून प्रवेश करून चोरून नेल्याबाबत तक्रार दिली होती.
त्यामुळे बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या तपास पथकास सदर सोडताना लवकरात लवकर शोधून काढण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते.
त्यावरून तपास पथकातील पोलीस अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने, शशिकांत दळवी व दीपक दराडे यांनी रात्रंदिवस आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकास गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली. आय.एस.एम.टी कंपनी मध्ये सिक्युरिटी म्हणून नोकरी करत असलेल्या कैलास लष्कर यांनी आपल्या गावाकडील तीन साथीदार आकाश ननवरे आशिष लष्कर व आकाश जाधव सदर लोखंडी रोडची चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तसेच तोडलेले लोखंड बारामती येथील सलमान खान व धर्मेंद्र चौधरी या दोघांना विकल्याचे सुद्धा निष्पन्न झाले होते. त्यांनी सदरची लोखंडी रोड पुढे जालना या ठिकाणी तेजस लोंकलकर उर्फ तेजा शेठ याला विकले होते.
या आरोपींना राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथून तसेच बारामती येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. तसेच जालना येथून तेजस लोंकलकर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, साहेब पोलीस निरीक्षक राहुल घुगे व बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक हे जालना इथून कोणी करा नाटक करून 100% रिकवरी करून लोखंडी रोल जालना वरून परत बारामती येथे आणले आहे. या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन असे मिळून 31 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात बारामती पोलीस त्यांना यश आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.
अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, राहुल घुगे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने, शशिकांत दळवी,  दीपक दराडे महिला पोलीस कॉन्स्टेबल रचना काळे यांनी ही कामगिरी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.