Pimpri traffic changes : दिवाळी सणामुळे पिंपरी बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज : दिवाळी सणामुळे पिंपरी बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल 18 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दुपारी 1 वा ते रात्री 10 वा पर्यंत लागू असतील. पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत पिंपरी बाजारपेठेत दिवाळी सणामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. (Pimpri traffic changes) त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने पिंपरी बाजारपेठेतून अवजड वाहने व सिटी बसचा मार्ग बाजारपेठेच्या बाहेरील रस्त्याने आवश्यक आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे उप आयुक्त आनंद भोईटे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

1) जय हिंद हायस्कूल- डीलक्स चौक- कराची चौक- रिव्हर रोड- भाट नगर चौक- पिंपरी पुल- मोरवाडी चौक- मुंबई पुणे जुना हायवे हा मार्ग अवजड वाहने व बस त्यांच्याकरिता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग : जय हिंद हायस्कूल- डीलक्स चौक- काळेवाडी- एम एम शाळेकडून उजवीकडे वळून एम्पायर इस्टेट मदर टेरेसा पुल- ऑटो क्लस्टर मार्गे मोरवाडी चौक- मुंबई पुणे जुना हायवे वरून इच्छित स्थळी जातील.

NCP Protest : ‘खाजगी बस चालकांना शंकरपाळी, नागरिकांना दिली महागाईची दिवाळी’

2) पिंपरी चौक- गोकुळ हॉटेल- पिंपरी पुल- शगुन चौक- कराची चौक- डीलक्स चौक- जय हिंद हायस्कूल- पिंपरी गाव हा मार्ग अवजड वाहने व सिटी बस यांच्याकरिता (Pimpri traffic changes) वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग : पिंपरी चौक- मोरवाडी चौक- एम्पायर इस्टेट मदर टेरेसा फ्लाय ओवर- एम एम शाळा कडून डावीकडे वळून काळेवाडी- डीलक्स चौक- जय हिंद हायस्कूल मार्गे इच्छित स्थळी जातील.

शगुन चौक येथे नागरिकांची ग्राहकांची गर्दी वाढल्यास पुल वरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून भाट नगर लिंक रोड मार्गे काळेवाडी कडे वळविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.