Pune News : खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू-वर मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – खान्देश मराठा मंडळाच्या (Pune News) वतीने खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू-वर मेळावा दि.13 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.

यावेळी माजी कृषी संचालक युवराज साळुंखे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर सोनू पगार, उपाध्यक्ष गुलाबराव सदाशिव पाटील, उपाध्यक्ष सयाजीराव रामराव पाटील, सचिव प्रदीप दामोदर शिंदे, खजिनदार भास्कर दगडू पाटील, सहसचिव अनिल फकीरा सावंत, हिशोबनीस जयवंत विनायक सिसोदे, संचालक मिलिंद भास्कर पाटील, संजय भागवत पाटील, सुरेश भगवान पाटील कृष्णराव चैत्राम अहिरराव आणि मार्गदर्शक कमिटी मधील भगवान केशव पाटील व संतोष दामोदर पाटील भिकनराव दयाराम पाटील, माधव बाबुराव पवार गंगाराम सखाराम पाटील आदी उपस्थित होते.

Maval News : सेलिब्रेशन क्लबकडून मावळमधील 15 विद्यार्थिनींना सायकल वाटप

मंडळाचे सचिव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मंडळाचे (Pune News) अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष बी. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवराज साळुंखे यांनी कार्यक्रमाला उद्देशून मार्गदर्शन केले.

वधू-वर यांचा परिचय पत्रक, वाचन मिलिंद पाटील व जयवंत सिसोदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भगवान पाटील यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार एस. आर. पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.