Maval News : सेलिब्रेशन क्लबकडून मावळमधील 15 विद्यार्थिनींना सायकल वाटप

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन्स (Maval News)यांच्या वतीने आंदर मावळातील आंबळे येथील 15 विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.

सरपंच सविता भांगरे,सरपंच मोहन घोलप यांच्यासह डिस्ट्रिक 3234 डी2 चे उपप्रांतपाल-2 ला.सुनील चेकर व लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशनसचे प्रेसिडेंट गुरुप्रसाद कनोजीया कलबचे संस्थापक शशीभाऊ कदम, खजिनदार धनंजय धुमाळ, माजी जितेंद्र ठोंबरे, झोन चेअरपर्सन भरत इंगवले व सायकल देणगीदार सर्व लायन सभासद या कार्यक्रमास उपस्थित होते.

त्यामुळे शिक्षणासाठी रोज 5 ते 6  किलोमीटर पायपीट करणा-या  सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबणार आहे. या पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी निगडी येथील प्रतिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत आहे. आंबळे,निगडे,खुरसुले तील मुली दररोज या शाळेत येत आहे.(Maval News) कधी एस.टी ने कधी बसने,कधी लिफ्ट मागून तर कधी पायपीट करीत हे विद्यार्थीनी शाळा गाठतात. विद्यार्थ्यांनीची दररोज होणारी पायपीट कमी करण्यासाठी क्लबचे माजी झोन चेअरपर्सन भरत इंगवले व अध्यक्ष गुरुप्रसाद कनोजिया यांनी पुढाकार घेऊन सायकलची ही मोठी मदत क्लबच्या सर्व सभासदाच्या मदतीने पार पाडली.

Pune News : आगीमध्ये जळालेल्या बसचे पालटले रुपडे; कोथरूड डेपोची विशेष कामगिरी

लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन्स गेली  कित्येक वर्ष सातत्याने ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेणयासाठी सायकल देऊन मदत करीत आहे. आजपर्यंत 300 सायकल दिले आहे.(Maval News) त्यामुळे या मदतीबद्दल पालक,शिक्षक व लोकप्रतिनिधींकडून खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम घेण्यासाठी मावळ भागातील सामाजिक कार्यकर्त रामदास वाडेकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक उत्तम मांडे व शिक्षक शशिकांत कोळेकर यांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.