Pune News : 22 फेब्रुवारीपासून पुण्यात वरिष्ठ गटाची राष्ट्रीय रोईंग स्पर्धा

एमपीसी न्यूज-  वरिष्ठ गटाची 40 वी राष्ट्रीय रोईंग स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून पुण्यात (Pune News) रंगणार आहे. लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) ट्रॅकवर ही स्पर्धा होणार असून, यासाठी 500 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेले हे एकमेव रोईंग केंद्र असून, येथे 25 राज्यातील स्पर्धक आपले कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना संघटन सचिव कर्नल आर. रामकृष्णन म्हणाले, आम्हाला देशातील सर्वोत्तम खेळाडूंच्या स्पर्धेचे आयोजन करताना आनंद होत आहे. या सर्व दर्जेदार खेळाडूंसाठी सर्व सुविधांनी असा मार्ग सज्ज आहे. ऑलिम्पियन, आशियाई आणि राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग असेल.
टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची जोडी अर्जुनलाल (Pune News) जाट आणि अरविंद सिंग यांचे प्रमुख आकर्षण असेल. ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी ही भारताची पहिली जोडी ठरली होती. त्यानंतर याच जोडीने गेल्यावर्षी थायलंड येथील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.

या खेरीज आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील अन्य पदक विजेते सुखमीत सिंग-झाकर खान (डबल्स स्कल्स), जसवीर सिग, इक्बाल सिंग, अक्षत तंवर, चरणजीत सिंग (लाईटवेट कॉक्सलेस फोर्स), जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष हे खेळाडू देखील सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय रोईंग महासंघाटे सरचिटणीस एम. व्ही. श्रीराम म्हणाले, या मार्गावर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे बारीक निरीक्षण करण्यात येईल. यासाठी 25-20  खेळाडूंसह आम्ही पूर्वीपासून तयारीला सुरुवात केली होती. या स्पर्धेत भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची आम्हाला अपेक्षा आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत पुरुष आणि महिला गटासाठी अनुक्रमे 2000  आणि 500 मीटरपेक्षा अधिक अंतराच्या स्पर्धा होणार आहेत.
पुरुष विभागासाठी सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस दुहेरी, कॉक्सलेस फोर्स, (सर्व 2000 आणि 500 मीटरमध्ये) या स्पर्धा प्रकारांचा समावेश आहे. खुल्या डबल स्कल्स आणि कॉक्सलेस फोर्स आणि कॉक्स एट या स्पर्धा फक्त 2000 मीटर प्रकारात होईल.
महिलांसाठी सिंगल स्कल्स, डबल स्कल्स, कॉक्सलेस दुहेरी, कॉक्सलेस फोर्स (2000 मीटर, 500 मीटर), दुहेरी स्कल्स स्पर्धा (500 मीटर) आणि पॅरा पुरुष सिंगल स्कल्स (200 मीटर, 500 मीटर) या स्पर्धा देखिल आयोजित केल्या जातील.
सीएमईमध्ये 2009 मध्ये तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर चौथ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वप्रथम 2014 मध्ये राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. त्यानंतर2018 मध्ये 37 व्या आणि 2019  मधये 39 व्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसऱ्या वर्षी होणाऱ्या या स्पर्धेला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (Pune News) आर्थिक पुरस्कार दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.