Maval News : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवल्यामुळेच जनता खासदार बारणे यांच्या पाठीशी – अर्जुन खोतकर

एमपीसी न्यूज – संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे कार्य प्रेरणादायी आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन अनेक प्रश्न सोडवण्याची क्षमता आप्पा बारणे यांच्यामध्ये असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आप्पांच्या मागे ठामपणे उभा राहिला (Maval News) आहे असे मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.

मावळ तालुका बाळासाहेबांची शिवसेना व जनसेवा विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खोतकर यांच्या हस्ते श्रीरंग बारणे यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

RPI : वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र  संपर्क प्रमुखपदी शशिकांत बेल्हेकर

अभीष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून यावेळी मावळ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. नापासांची शाळा चालवणारे प्रा. नितीन फाकटकर, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक, ज्येष्ठ निवेदक अनिल धर्माधिकारी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, डॉ. अनिल उनकुले तसेच दिव्यांग विकास संस्था (तळेगाव दाभाडे) आदींना मावळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

काँग्रेस कमिटीचे दिलीप ढमाले, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे बाळासाहेब नेवाळे, कामगार नेते इरफान सय्यद, तळेगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश काकडे आदींची याप्रसंगी भाषणे झाली.

मावळ तालुक्याच्या वतीने तळेगाव शहरांमध्ये प्रथमच माझा वाढदिवस साजरा होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे खासदार बारणे यांनी या वेळी नमूद केले.

पुढील काळात जोमाने तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानूनच काम करीत राहीन, असे वचन याप्रसंगी खासदार बारणे यांनी दिले.

यावेळी पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, देहू अध्यक्ष सुनील हगवणे, तळेगाव शहराध्यक्ष दत्ता भेगडे, तालुका संघटक सुनील मोरे, शेखर भोसले, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, सरचिटणीस कल्पेश भगत, नगरसेवक समीर खांडगे, सुनील कारंडे, रोहित लांघे आदी मान्यवर  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.