Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘वीरा’ ने  मिळवली ए ग्रेड 

एमपीसी न्यूज – श्वान प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर (सीआयडी) येथे स्फोटके ओळखण्याच्या प्रशिक्षण दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या श्वान ‘वीरा’ ने ए ग्रेड (Pune News)मिळवली आहे.

बॉम्बशोधक व नाशक पथक पुणे ग्रामीण येथे पहिल्यांदा बेल्जियम मलिनोईस जातीची अत्यंत चणाक्ष श्वान पोलीस दलामध्ये 2 मार्च 2022 रोजी अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या देखरेखी खाली दोन महिन्याचे पिल्लू असताना  खरेदी करण्यात आले होते.

 नवीन पिल्लाचे नाव वीरा ठेवण्यात आले. श्वान वीरावरती प्रथम हस्तक म्हणून पोलीस हवालदार गणेश फापाळे व दुय्यम हस्तक पोलीस नाईक गोरखनाथ भामगर यांची निवड करण्यात आली होती. विराही सहा महिन्याची झाल्यानंतर तिला श्वान प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर (सीआयडी) येथे स्फोटके(Pune News)ओळखण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या आर्टिकल चे प्रशिक्षण श्वान वीरा हिला  देण्यात आले होते.

Sangavi News : जुनी सांगवीतील चंद्रमणी चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, नागरिक हैराण

16 जानेवारी 2023 मध्ये सहा महिने पूर्ण झाल्याने श्वान वीरा हिची अंतिम परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये तिने वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये बॉम्बचे आर्टिकल शोधले. त्यामध्ये तिला ए ग्रेड मिळाली आहे.

श्वान वीराच्या चांगल्या कामगिरीमुळे अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, नितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक नलावडे, बॉम्बशोधक नाशक पथक यांनी श्वान वीरा पोलीस हवालदार गणेश फापाळे व पोलीस नाईक गोरखनाथ भामगर यांचे विशेष (Pune News)कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.