Sangavi News : जुनी सांगवीतील चंद्रमणी चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, नागरिक हैराण

एमपीसी न्यूज : जुनी सांगवीचील चंद्रमणी चौकातील रस्त्यावर, व रिक्षा स्टॅंडवर ड्रेनेजमधील सांडपाणी येत असल्याने येथील नागरिक पुरते हौराण झाले आहेत. (Sangavi News) चंद्रमणी चौकात असलेल्या महानगरपालिकेच्या ड्रेनेजची पाईपलाईन तुंबल्याने ड्रेनेजमधील सांडपाणी गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जुनी सांगवी मधील चंद्रमणी चौकात महानगरपालिकेच्या मैलापाणी(ड्रेनेज) पाईपलाईन तुंबल्याने हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असून हे सांडपाणी चौकतील बैठ्या घरात जात आहे. पाण्याच्या उग्र दर्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धाेक्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष , राजु सावळे यांनी दिली.

Pune News : सिटी प्रिमियर लीग सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धेत सक्सेस स्ट्रायकर्सने गाठली अंतिम फेरी

तसेच चौकातील रिक्षा स्टॅन्डमध्येही या सांडपाण्याचा शिरकाव होत आहे. परिणामी रिक्षा चालकांनाही नाहक त्रास होत आहे.  हा त्रास गेली तीन दिवस होत आहे. (Sangavi News) काल महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाचे अधिकारी सक्शन मशीन लावून मैला उपसून गेले मात्र तरीही सांडपाणी काही प्रमाणात रस्त्यावर येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे अशी मागणी नागरिंकाकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, काल सक्शन मशीन लावल्याने आज त्रास कमी आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उद्या ड्रेनेज चेंबर साफ केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.