Pune News : पतंगाच्या मांज्यामुळे अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज-आज दुपारी पतंगाच्या मांज्यामुळे पुणे अग्निशमन विभागातील कर्मचारी नवनाथ मांढरे गंभीर जखमी झाल्याची (Pune News)  माहिती अग्निशमन विभागाचे निलेश महाजन यांनी दिली आहे.मांढरे यांचे नशीब बलवत्तर असल्याने व  प्रचंड इच्छाशक्तीमुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.

Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘वीरा’ ने  मिळवली ए ग्रेड 

 नवनाथ मांढरे हे मुख्य अग्निशमन केंद्र, भवानी पेठ, लोहिया नगर येथे काम करतात. ते आज दुपारी 2.15 वा ड्युटी साठी हजर झाले तेव्हा त्यांना कोंढवा येथील अग्निशमन केंद्रामध्ये काम करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यामुळे ते त्यांच्या दुचाकीवर तिकडे जात असताना अप्सरा टॉकीज जवळ गुलटेकडी उड्डाणपुलावरून जात असताना अचानक त्यांच्या मानेभोवती पतंगाचा मांजा अडकला.यात ते गंभीर जखमी झाले.गंभीर जखमी असताना देखील प्रसंगावधान राखून मांढरे यांनी खाली उतरून हाताने मांजा तोडला जेणेकरून इतर कुणीही जखमी होऊ नये.  मांढरे यांना बिबवेवाडी येथील ई एस आय (Pune News)हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

पतंग उडविण्यासाठी माझ्या वापरण्यावर बंदी असतानाही मांजाचा वापर होताना पुणे शहरात दिसत आहे. यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. रविवारी पोलीस कर्मचारी सुनील गवळी आणि महेश पवार हे पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाण  पुलावरून जाताना पवार यांच्या गळ्याला मांजा अडकला तर गवळी यांचा हात मांजाने कापला गेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.