Today’s Horoscope 18 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – बुधवार

18-01-2023

शुभाशुभ विचार- 17 पर्यंत चांगला.

आज विशेष- षटतीला एकादशी

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – अनुराधा 17.23 पर्यंत नंतर ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.


आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- मोरपंखी ) 

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनशांती मिळेल. आज कोणतेही धाडस नको.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे.

मिथुन ( शुभ रंग- जांभळा )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील आज तब्येत थोडी नरमच राहील. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ असेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. कलाक्रीडा क्षेत्रातील नवोदिकांच्या कष्टांचे चीज होईल.

सिंह (शुभ रंग- पांढरा )

मंदावलेल्या व्यापार उद्योगास आज चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही आज ठाम असाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील विद्यार्थ्यांनी पालकांच्या आद्यबाहेर जाऊ दे

कन्या ( शुभ रंग- क्रीम )

ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. काही अति हुशार मंडळी आज भेटतील. कमीच बोलणे हिताचे राहील.

Pune News : मॉडर्न कॉलेजच्या 1997 च्या बॅचचा रौप्यमहोत्सवी मेळावा उत्साहात

तूळ ( शुभ रंग- भगवा )

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची ऊठबस गृहिणी आनंदाने करतील.

वृश्चिक (शुभ रंग- तांबडा )

आज कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दात स्मार्ट राहील व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा संभवतो.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष द्या परमार्थ परवडणारा नाही.

मकर ( शुभ रंग- निळा )

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येतील.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी )

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल.हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. आज विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देऊ शकाल.

मीन -(शुभ रंग – चंदेरी )

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल पण हातसे सोडून पडत्या मागे धावायचा मोह टाळा. स्वतःवर संयम ठेवा ज्येष्ठांना उपासनेची आज प्रचिती येईल.

 

 

    शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तु सल्लागार

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.