Pune News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन 

एमपीसी न्यूज – पुण्यात काल एका १४ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक पाशवी बलात्कारामुळे शहर हादरून गेले. घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे मूक आंदोलन करण्यात आले.

सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. पुणे शहर काँग्रेस महिला कमिटीच्या अध्यक्षा  सोनाली मारणे  यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या माजी महापौर कमल व्यवहारे, काँग्रेस पुणे शहर जिल्हा सरचिटणीस संगीता तिवारी, अनुशा गायकवाड, नीता परदेशी, दीप्ती चवधरी, नलिनी दोरगे व पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.

या वेळी बलात्कार केलेल्या नराधामाचा निषेध करण्यात आला. सोनाली मारणे  म्हणाल्या की, मुलींना आजकाल सुरक्षित राहता येत नाही. देशात महिला व मुली सुरक्षित नाहीत. त्यांनी जगायचे कसे. केंद्र सरकारने या नराधामाना अटक करावी. आमची केंद्र व राज्य सरकारला

विनंती आहे की, मुलींना या नराधामा पासून त्यांनी वाचवावे. तसेच या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा होऊ दे, म्हणून आम्ही आज मूक आंदोलन करत आहोत.

संगीता तिवारी म्हणाल्या की, पुण्यात रोज मुलींवर व महिलांवर बलात्कार होत आहेत. या नराधमांवर कारवाई केली नाही, तर अशा घटना वाढत जातील. सरकारने ठोस पावले उचलावित.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.