Pune News : पर्यावरण योद्धयांचीही समाजाला गरज – खासदार वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील सामाजिक उपक्रमाबरोबर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरण योद्धयांचीही समाजाला गरज आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून अनिल मंद्रुपकर यांनी दोन्ही क्षेत्रात दोन दशके दिलेले योगदान आदर्शवत आहे. असे, प्रतिपादन खासगार वंदना चव्हाण आज (रविवारी) केले. 
लायन्स क्लब इको फ्रेंड्सचे संस्थापक अनिल मंद्रुपकर यांच्या स्वच्छ भारत अभियानातील आणि पर्यावरण रक्षण योगदानाबद्दल वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी चव्हाण बोलत होत्या.
चव्हाण म्हणाल्या, ‘कार्पोरेट क्षेत्रात असतानाही मंद्रुपकर यांनी ग्रामीण भागातील समाजोपयोगी उपक्रमांसाठी, पर्यावरण रक्षण उपक्रमासांठी दोन दशके वेळ दिला. गावांमधील स्वच्छतागृहे उभारणीपासून किल्ला संरक्षण, स्वच्छ स्वारगेट प्रकल्प, वृक्षारोपण अशा अनेक माध्यमातून त्यांनी योगदान दिले. शहरीकरण वाढत असताना शहरी भागातही मोठ्या प्रमाणात अभिनव मार्गानी योगदान देण्याची गरज असून अनिल मंद्रुपकर यांच्यासारख्या समर्पित व्यक्तींनी त्याकडे लक्ष केंद्रित करावे.
अनिल मंद्रुपकर म्हणाले, ‘लहानपणीच  मनात समाजसेवेची आस होती. 1988 पासूनच मी लायन्स क्लब सोबत आहे. केवळ निवृत्ती नंतर समाजसेवा केली जावू नये, तर समाजसेवा हा निरंतर चालू ठेवण्याचा विषय आहे. नोकरी सांभाळून उरल्या वेळेत, साप्ताहिक सुटीच्या दिवशी प्रत्येकाने समाजकार्याला वेळ दिला पाहिजे असे मंद्रुपकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.