Dehu News : देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान बंद

0

एमपीसी न्यूज – देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार आहे. श्री संत तुकारम महाराज संस्थानने याबबात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. शहरात वाढत असलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने 16 नोव्हेंबरला आदेश काढून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, येत्या 26 नोव्हेंबरला पंढरपूरची कार्तिकी एकादशी आहे. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.

या कालावधीत मंदिरात होणारे नियमित कार्यक्रम, महापुजा, कीर्तन इत्यादी संस्थानाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III