Pune News : 17 वर्षांखालील महिलांच्या राष्ट्रीय सराव चाचणी शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज-17 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय संघ निवडीसाठी उद्या शनिवार ( 21 जानेवारी) आणि रविवारी ( 22 जानेवारी) पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवाजीराजे छत्रपती क्रीडा संकुलात सराव (Pune News)चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेने उद्या 21 आणि परवा रविवारी 22 तारेखस दोन दिवस चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात नियमानुसार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2009 या कालवधीत जन्म झालेले खेळाडू पात्र ठरतील. (Pune News)त्याचबरोबर नोंदणी केलेल्या खेळाडूंना दोन्ही दिवस शिबिरात उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

Pune News : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे कोंम्बिग ऑपरेशन

17 वर्षांखालील मुलींसाठी संधी सुधारण्याच्या दृष्टिने आणि फुटबॉलचा पाया भक्कम करण्यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाने सर्व जिल्हा आणि राज्य संघटनांना निवड चाचण्या घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात दोन दिवस या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. चाचणी पुणे, सातारा, नगर येथील खेळाडूंसाठी उपलब्ध असेल. दोन दिवस चाचणी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात घेतली जाईल.

जिल्हा संघटनेशी सलंग्न संघटना आणि संघांनी(Pune News) या संधीचा लाभ घेऊन आपल्या 17 वर्षांखालील खेळाडूंना या चाचणीत उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे जिल्हा संघटनेने केले आहे. शिबिरातील खेळाडूंच्या संख्येवर किंवा जिल्हा संघटनांना खेळाडू पाठविण्याच्या संख्येवर मर्यादा नाहीत. फक्त, सर्व खेळाडूंनी शिबिरासाटी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. चाचणी दरम्यान खेळाडूंनी आपले आधार कार्ड जवळ बाळगणे अनिवार्य आहे.

शिबिरातून निवड झालेल्या खेळाडूंना 24 जानेवारीस होणाऱ्या 17 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय शिबिरात पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी परेश शिलवकर (9637602676) यांच्याशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.