Pune News : उद्या पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज-महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (Pune News) शहराच्या विविध भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागाचा पाणीपुरवठा येत्या  बुधवार आणि गुरुवारी (15 आणि 16 फेब्रुवारी) बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद असलेल्या भागात दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

पुढील भागांचा पाणीपुरवठा बुधवारी (15 फेब्रुवारी) बंद राहणार आहे.

नऱ्हे, धायरी, धायरी खंडोबा मंदिर परिसर 

चतु:शृंगी टाकी परिसर – बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ॲम्युनिशन फॅक्‍टरी, अभिमानश्री सोसायटी.

पद्मावती टाकी परिसर – बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाऊन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र – ससाणेनगर, काळेबोराटे नगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.