Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

एमपीसी न्यूज- पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरू नगर जवळ ( Pune News) सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या 17 महिलांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अन्य महिला या गंभीर जखमी झाल्या आहेत. राजगुरुनगर जवळच्या शिरोली गावाच्या हद्दीत सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला.

Pune News : उद्या पुणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, या सर्व महिला जवळच असणाऱ्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करत होत्या. सोमवारी मध्यरात्री काम संपल्यानंतर पुण्याकडून येणाऱ्या बसमधून त्या खरपुडी फाटा येथे उतरल्या. त्यानंतर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

जखमी महिलांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर वाहन ( Pune News) चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या भीषण अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.