Pune : बालगंधर्व चौक येथे रस्त्यावर तेल गळती

एमपीसी न्यूज – बालगंधर्व चौक (Pune) येथे आज (शुक्रवारी) सकाळी एका अज्ञात वाहानातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेळगळती झाली होती. मात्र, अग्निशमन दलामार्फत वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सकाळी अग्निशमन दलाला बालगंधर्व चौकात तेलगळती झाल्याची वर्दी मिळाली त्यानुसार अग्निशमन दलाचे एक वाहन घटनास्थळी पोहचले. हा चौक रहदारीचा व वर्दळीचा असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे जवानांनी गांभीर्य ओळखून रोडवर माती टाकली, जेणेकरून वरून जाणारी वाहने घसरणार नाहीत.

Pune Workers : भारतीय मजदूर संघाचा मुंबईमध्ये मोर्चा; पुण्यातील हजारो कामगार सहभागी

चिंचवड येथे काही दिवसांपूर्वी बसमधून रोडवरती तेलगळती झाल्याचे नऊ ते दहा वाहने घसरली होती. तेथेही अग्निशमनदलाने पाण्याचा फवारा मारून रस्ता (Pune) धुवून काढला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.