Pune Workers : भारतीय मजदूर संघाचा मुंबईमध्ये मोर्चा; पुण्यातील हजारो कामगार सहभागी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कामगारांना (Pune Workers) शाश्वत रोजगार व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कांच्या मागणी बाबतीत सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, यासाठी भारतीय मजदूर संघाने मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा आयोजित केला होता. ज्यामध्ये पुण्यातील हजारो कामगार सहभागी झाले होते.

यावेळी पुणे जिल्ह्याचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ सेक्रेटरी, सचिन मेंगाळे (सरचिटणीस अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ) संजय मेनकुदळे (संरक्षण), कामगार महासंघाचे सुरेश जाधव, कंत्राटी संघांचे निखिल टेकवडे, दिपक कुलकर्णी ( मनपा), अशोक थोरात (संरक्षण कंत्राटी संघ), विलास टिकेकर (बॅंक), उमेश विस्वाद (बिडी), बेबी राणी डे (अखिल भारतीय बिडी मजदूर), ललिता पवार (घरेलु), विवेक ठकार (राज्य सरकारी कामगार), वंदना कामठे (टेलीफोन), अनिल पारधी (सुरक्षा रक्षक) तसेच पुणे जिल्हातील विविध उद्योगातील पदाधिकारी उपस्थित होते. औद्योगिक, वीज, संरक्षण, बँका, पोस्ट, कंत्राटी कामगार, बिडी, घरेलु, हॉस्पिटल नगर पालिका, राज्य सरकारी व वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी पुढील मागण्या सरकारसमोर मांडण्यात आल्या – Pune Workers

1) हरियाणा, ओडिसा, राजस्थान, पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्रात कंत्राटी कामगार पद्धत बंद करून कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावेत.

2) जिल्हा स्थानिक कामगार राज्य रूग्णालय सुरू करावे.

3) बांधकाम व सुरक्षा मंडळाचे व घरेलु कामगार मंडळाचे लाभ पूर्व लक्षी प्रभावाने द्यावा.

4) अंगणवाडी सेविकांना किमान 15 हजार रूपये मानधन द्यावे.

5) बिडी कामगारांच्या किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करावी व त्याना मागील फरक देण्यात यावा.

6) रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.

8) वेतन कोड 2019 व सामाजिक सुरक्षा कोड 2020 त्वरित लागू करावे. असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा.

9) औद्योगिक संबंध कोड 2020 व औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती कोड 2020 या मधील कामगार विरोधी तरतूदी रद्द कराव्यात.

10) सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण व निर्गुंतवणूक थांबवा.

11) कोरोना काळात सेवा दिलेल्या आरोग्य सेवेतील कामगारांना शासन सेवेत कायम करावे. या मागण्या केल्या आहेत.

महामोर्चा मध्ये भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव सुरेद्रनजी पांडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येणूरे, श्रीपाद कुटासकर उपस्थित होते. मुंबई भारतीय मजदूर संघ अध्यक्ष बापू दडस यांनी सुत्रसंचालन व सचिव संदीप कदम यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.