Bhosari : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – तरुणीला लग्नाचे आमिष (Bhosari) दाखवून लॉजवर नेत लौंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2022 महिन्यात भोसरी येथे घडला आहे.

याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.22) फिर्याद दिली असून राजू मुसाळे (वय 20 रा. रळी कांचन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : बालगंधर्व चौक येथे रस्त्यावर तेल गळती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपीच्या (Bhosari) इन्स्टाग्रामवरून जून 2022 मध्ये ओळख झाली. महिनाभर चॅटिंगद्वारे फोनवर बोलल्यानंतर, आरोपीने फिर्यादीला गोड बोलून भेटण्यास बोलावले. भोसरी येथे एका लॉजवर नेत त्याने फिर्यादीला गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने फिर्यादी यांना कोणास काही सांगितले, तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली. फिर्यादी या पाच महिन्याच्या गर्भवती राहिल्या असल्याने आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.