Pune :नवरात्रीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवरात्र उत्सवानिमित्त (Pune)विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यांतर्गत विविध चर्चासत्र, व्याखान व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार (१६ -२० ऑक्टोबर) अशा पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात डॉ. वृषाली रणधीर यांच्या ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाने होणार आहे.

PUNE :पुण्यातील त्या जागेशी अजित पवारांचा काहीही संबंध नाही; माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांचा खुलासा

विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर अशा कर्तृत्वान महिलांचा सत्कार (Pune) करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांत आंतरारष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, आर्यनमॅन ऋतुजा उडपीकर, फिटनेस प्रभावक सोनाली तळावलीकर, उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश डॉ. शालिनी जोशी-फणसळकर, पत्रकार मीनाक्षी गुरव, पत्रकार अर्धरा नायर, महिला व्यावसायिक डॉ. मेधा ताडपत्रीकर, मेट्रोची पहिली महिला चालक अपूर्वा अलाटकर, शास्त्रज्ञ डॉ. स्मिता झिंजार्डे तसेच एव्हरेस्टवीर अपर्णा प्रभुदेसाई या कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभगृहात रोज दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.