PUNE : पुण्यातील त्या जागेशी अजित पवारांचा काहीही संबंध नाही; माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांचा खुलासा

एमपीसी न्यूज -पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Pune) लिखित ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकाच्या ‘द मिनिस्टर’ या पुस्तकात उल्लेखिलेल्या “दादा” यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी केला आहे.

येरवडा येथे पोलिसांच्या घरांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा तत्कालीन “दादा” नामक मंत्र्याने लिलाव (Pune) करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मी हाणून पाडला, असा गौप्यस्फोट पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

Bopodi : बोपोडी येथे रक्तदान शिबीरात प्रतिसाद, 113 जणांचे रक्तदान

मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात ‘दादा’ असा उल्लेख केला आहे. पुस्तकात उल्लेखिलेल्या दादांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी केला आहे.

दिलीप बंड यांनी त्यांच्या काळात शासनाला हा दिला होता प्रस्ताव. हे सर्व प्रकरण गृह खात्याशी निगडित होतं. त्यावेळेस गृहमंत्री आर आर पाटील होते, त्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली होती.

दिलीप बंड म्हणाले, त्यावेळेस ते काम झालं असतं तर आता पोलिसांना घर मिळाली असती, ते काम रखडल्याने 13 वर्षा नंतरही पोलिसांना घर मिळाली नाहीत. अजित पवार यांनी त्याकाळात पालकमंत्री म्हणून केवळ बैठक घेतली होती. त्यांच्याशी या प्रकरणाचा काहीही संबंध नाही.
गृहमंत्री आर आर पाटील व गृह विभाग यांच्याशी सर्व प्रकरण निगडित असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.