Pune : पुण्यात घरगुती सिलेंडरच्या स्फोटात एक जण जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील खडकवासला जवळील उत्तमनगर (Pune) परिसरात काल (मंगळवारी) रात्री सव्वा दहाच्या सुमारास स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाला ज्यामध्ये एकजण जखमी झाले आहे.

Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अच्युत गोडबोले यांना जाहीर

या घटनेत सखाराम पाटोळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. घटना घडली त्यावेळी पाटोळे घरात असताना स्वयंपाक करत होते. सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागून ते जखमी झाले स्थानिक नागरिक आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर त्यांना बाहेर काढून दवाखान्यात दाखल करण्यात आले.

आगीच्या स्फोटाने पाटोळे राहत असलेले आणि त्यांच्या शेजारील घराच्या काचा देखील या घटनेत फुटलेल्या आहेत. पीएमआरडीए आणि वारजे येथील अग्निशामक दलाची गाडीने आग आटोक्यात (Pune) आणली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.