Pune News : पोलीस भरती प्रक्रियेसाठी आमिषांना बळी पडू नका, संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधा – पुणे पोलीस

एमपीसी न्यूज पुणे शहर अस्थापनेवरील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक यांच्या भरती प्रक्रियेला मंगळवार (दि.3) पासून सुरुवात झाली आहे. (Pune News) या काळात उमदवारांना अनेक जण प्रलोभने, खोट्या थापा मारून आकर्षित करत असतात, मात्र या आमिषांना बळी पडू नये,तसा काही संशय आल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवहान पुणे पोलिसांनी केले आहे.

पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात कालपासून या भरती प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. (Pune News) 3 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत पोलीस शिपाई या पदाची भरती प्रक्रीया पार पडणार असून 18 जानेवारी रोजी पोलीस शिपाई चालक  पदाची भती प्रक्रीया सुरु होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना MAHA-IT या साईटवरून सुचना व नियोजीत तारखा देण्यात आल्या आहेत. नियोजीत तारखेला उमेदवार उपस्थित राहिला नाही तर कोणत्याही कारणाने उमेदवाराला तारीख बदलून किंवा दुसरी  संधी मिळणार नाही. तसेच उमेदवारांनी भरतीसाठी येताना आवेदन अर्जाच्या व आवश्य कागदपत्रांच्या दोन प्रती सोबत ठेवाव्यात.

या कालावधीत कोणी प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरीत दक्षता अधिकारी (व्हीजन ऑफीसर) यांना संपर्क साधावा, दक्षता अधिकाऱ्यांची माहिती पुढील प्रमाणे

अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा – 7020692797

पोलीस उप आयुक्त आर.राजा – 9490776928

पोलीस उप आयुक्त संदिप सिंह गिल्ल -8289005133

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.