Pune : नो पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

एमपीसी न्यूज – वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे (Pune) सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील वारजे वाहतूक विभागांतर्गत नो पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची रमा पुरुषोत्तम शाळेच्या आऊट गेट-लक्ष्मी माता मंदिर ते भाजी मंडई (पंढरी निवास इमारत/श्री क्लिनिक समोर) मावळे आळी कडून कमिन्स चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूस 75 मीटर भागात सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे.

Moshi : मोशी येथील खुनाचा दरोडा विरोधी पथकाने केला उलगडा

वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती (Pune) असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक 6, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात 21 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.