Pune : नातेवाईक तरुणाकडून 22 वर्षीय युवतीवर लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार

एमपीसी न्यूज : नातेवाईक असलेल्या एका तरुणाने 22 (Pune) वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आणि काही वर्षानंतर लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर 25 वर्षीय तरुणाविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहे. 2019 मध्ये आरोपीने फिर्यादीला सर्वप्रथम लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी तरुणीही त्याच्या या आमिषाला बळी पडली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला लॉजवर घेऊन जात आणि तिच्या घरी घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. तब्बल तीन वर्षे हा सर्व प्रकार सुरू होता.

Pune Crime : ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का? असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण

दरम्यान पीडित तरुणीने आरोपीला लग्नाविषयी विचारणा (Pune) केली असता आरोपीने ठार मारण्याची धमकी देऊन लग्न करण्यास नकार दिला. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.