Pune Crime : ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का? असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : जंगली महाराज रस्त्यावर (Pune Crime) एका वकिलाला आलिशान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पत्ता विचारणे चांगलेच महागात पडले. ऑडीमध्ये बसलेल्या व्यक्तीने ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का? असे म्हणून त्यांना मारहाण केली. जंगली महाराज रस्त्यावरील सुभद्रा हॉटेलच्या समोर हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी विशाल शंकर सोनवणे (वय 42, तिरुपती टाऊनशिप भैरव नगर धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार एमएच 14 आर एफ 6685 या ऑडी कारवरील चालकाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी (Pune Crime) यांनी डेक्कन परिसरातील सुभद्रा हॉटेल समोर थांबलेल्या एका ओळीतील व्यक्तीला ज्ञानमुद्रा टिटोरियल क्लासचा पत्ता विचारला होता. याचा राग मनात धरून ऑडी चालकाने “तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत” असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर कार वेगाने घेऊन जात असताना गाडीचे चाक फिर्यादींच्या पायावरून गेले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune : पुणे परिमंडलात गेल्या तिमाहीत वीजबिलांसाठी ‘ऑनलाइन’ ग्राहकांची संख्या तब्बल 56 लाखांवर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.