Pune : पुणे परिमंडलात गेल्या तिमाहीत वीजबिलांसाठी ‘ऑनलाइन’ ग्राहकांची संख्या तब्बल 56 लाखांवर

एमपीसी न्यूज : पुणे परिमंडलाने (Pune) वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यातील आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल 55 लाख 94 हजार 476 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे 1375 कोटी 18 लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. तर या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील 1 कोटी 60 लाख 45 हजार 632 लघुदाब वीजग्राहकांनी तब्बल 4112 कोटी 71 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे.

उच्चदाब वीजग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे व ते अनिवार्य देखील आहे. तर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय आहे. त्यासाठी 10 हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर त्यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणचे अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अॅपची सोय उपलब्ध आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच (Pune) खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत.

गेल्या एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंत पुणे परिमंडलातील लघुदाब वर्गवारीतील सरासरी 17 लाख 41 हजार 860 वीजग्राहक दरमहा ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा करीत होते. मात्र ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत ग्राहकांची दरमहा सरासरी संख्या थेट 18 लाख 64 हजार 822 वर गेली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरणाऱ्या पुणे परिमंडलातील ग्राहकांची संख्या 20 लाखांवर जाईल असे चित्र आहे.

गेल्या तिमाहीमध्ये पुणे शहरातील 31 लाख 56 हजार 69 लघुदाब वीजग्राहकांनी 740 कोटी 40 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक 5 लाख 28 हजार 248 ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये दरमहा सरासरी 4 लाख 38 हजार वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या तिमाहीत (Pune) लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 14 लाख 77 हजार 830 ग्राहकांनी 375 कोटी 65 लाखांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे. गेल्या तीन महिन्यांत या शहर अंतर्गत पिंपरी विभागातील 8 लाख 65 हजार 953 तर भोसरी विभागातील 6 लाख 11 हजार 877 ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद वाढला आहे. यात गेल्या तिमाहीत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील 09 लाख 60 हजार 568 ग्राहकांनी 259 कोटी 13 लाख रुपयांचा सुरक्षितपणे भरणा केला आहे.

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व 24 तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना  www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.

लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटद्वारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. विशेष म्हणजे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच संबंधीत ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे.

Kondhwa : कोंढवा येथे स्पा सेंटरवर छापा; तीन परदेशी व एका भारतीय पिडीत मुलींची सुटका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.