Pune :विमानात बॉम्बची अफवा, आकास एअरच्या पुणे-दिल्ली विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

एमपीसी न्यूज – आकासा एअरच्या पुणे-दिल्ली फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या (Pune) प्रवाशांपैकी एका प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केल्याने विमानाचे मुंबई येथे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. पुणे विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने जात असताना ही घटना घडली.

प्रवाशांनी केलेल्या दाव्यामुळे विमान कंपनीचे कर्मचारी सतर्क
(Pune )झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाची (BDDS) टीम आधीच वाट पाहत असलेल्या मुंबई विमानतळाकडे विमान वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर बीडीडीएस अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या बॅगची कसून तपासणी केली, पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही.

Pune : आगामी सणांसाठी पुणे अमरावती दरम्यान धावणार आठ विशेष रेल्वे

अकासा एअर फ्लाइट QP 1148, 21 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्याहून दिल्लीला 00:07 वाजता उड्डाण केले आणि 185 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स घेऊन उड्डाण घेतल्यानंतर लगेचच सुरक्षा सूचना प्राप्त झाली,” आकासा एअरने अधिकृत निवेदनात म्हटले आहे .”सुरक्षा आणि सुरक्षेच्या प्रक्रियेनुसार, विमान मुंबईकडे वळवण्यात आले. कॅप्टनने सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियांचे पालन केले आणि 00:42 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले,” असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रवाशाला मुंबई विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.