Pune : आगामी सणांसाठी पुणे अमरावती दरम्यान धावणार आठ विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे अमरावती (Pune) मार्गावर आठ विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. यातील चार रेल्वे पुणे तर चार रेल्वे अमरावती येथून सुटतील.

असे असेल गाड्यांचे वेळापत्रक –

1) गाडी क्रमांक 01209 MEMU स्पेशल अमरावती येथून 05.11.2023 ते 19.11.2023 पर्यंत दर रविवार आणि बुधवारी 12.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.45 वाजता पुण्याला पोहोचेल.

Pune : खडकवासला धरण परिसरातील औषध प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) ची मागणी

2) गाडी क्रमांक 01210 MEMU स्पेशल पुण्याहून दर गुरुवार(Pune) आणि सोमवारी 06.11.2023 ते 20.11.2023 या कालावधीत 06.35 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अमरावती येथे 19.50 वाजता पोहोचेल.

3) थांबे: – अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे.

यामुळे पुण्याहून विदर्भात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. सणांच्या वेळी होणाऱ्या प्रवाश्यांचे हाल पाहता हा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तरी नारिकांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.