Ankit Goyal : अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक पदी अंकित गोयल यांची नियुक्ती राज्य सरकारने 20 ऑक्टोबरला केली होती.(Ankit Goyal) आज त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे.

अंकित गोयल यांनी इलेक्ट्रॉनिक सबंधी ची पदवी घेऊन भारतीय पोलीस सेवेत 13 फेब्रुवारी 2012 रोजी रूजू झाले. त्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून 28 सप्टेंबर 2020 रोजी पदभार स्वीकारला होता.

त्यांच्या दोन वर्षाच्या तेथील कार्यकाळात 54 नक्षलवादी मारले गेले तर 44 जणांना अटक करण्यात आले. 12 नक्षलवाद्यांनी आजपासून आपण केले होते.(Ankit Goyal) त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांनी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले होते.

Chhath puja : इंद्रायणी घाटावर छठ पूजेचा महाकुंभ, काशी गंगा आरती पाहण्यासाठी भक्तीसागर लोटला

पुढील काही महिन्यात पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Ankit Goyal) आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा आणि व्यवस्था टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान अंकित गोयल यांच्यासमोर असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.