Pune News: पुण्यातील शिवणेपुलावरून तरूण बूडाला

एमपीसी न्यूज –पुण्यातील शिवणेपुलावर अडकलेल्या दोन तरुणांमधील एक तरूण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार आज (मंगळवारी) पहाटे साडे चारच्या सुमारास घडला आहे. (Pune News) यातील एका तरुणाला अग्निशामकदलाने सुखरुप बाहेर काढले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार निखील कौशीक (वय 25) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर आशिष रोठाड याला वाचवण्यात यश आले आहे. याबाबत राठोड याने उशीरा याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

 

Chandrakant Patil : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये एकजूट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांची घेतली भेट

 

शिवणे पुलावर हे दोन तरुण बसले होते. यावेळी पुला खालचा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे यापैकी एक तरुण हा या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे . (Pune News) हे दोन्ही तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसऱ्या तरुणाने पुलावरील खांबाला धरून ठेवल्याने तो त्याच ठिकाणी अडकला होता. स्थानिकांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली.

 

हे दोघेही तरुण शिवणे येथील एका हॉटेलमध्ये कामाला होते. दरम्यान  अग्निशमन दलाकडून वाहून गेलेल्या तरुणचा अद्याप शोध सुरु आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.