Pune : दिग्गजांनी केलेल्या बोरन्हाणाने वंचित-विशेष मुलांच्या चेह-यावर फुलले हास्य  

एमपीसी न्यूज – नवीन कपडे, रंगीबेरंगी गॉगल्स आणि विविध प्रकारचे हलव्याचे दागिने घातल्यावर वंचित-विशेष मुले हरखून गेली. बोरं, लाह्या, चॉकलेट, गोळ्या यांचा वर्षाव करीत तरुणाईसह दिग्गजांनी वंचित-विशेष मुलांचे बोरन्हाण केले. मकर संस्क्रांतीनिमित्त दिग्गजांनी केलेल्या बोरन्हाणामध्ये वंचित चिमुकल्यांच्या चेह-यावर हास्य फुलले.

वंचित-विशेष मुलांना देखील सणाचा आनंद घेता यावा यासाठी मकर संस्क्रांतीनिमित्त मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे वंचित-विशेष मुलांकरिता बोरन्हाणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारागृह प्रशासनाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सिंहगड मेडीकल कॉलेजचे उपअधिष्ठाता डॉ. सचिन वानखेडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, सेवासदन संस्थेचे श्रीधर पाटणकर आदी उपस्थित होते.

यावेली बोलताना डॉ. विठ्ठल जाधव म्हणाले, वंचित मुलांना देखील सण-उत्सव साजरे करता यावे यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. इतरांनी देखील आपले सण-उत्सव अशा वंचित-विशेष मुलांसोबत साजरे करायला हवे त्यामुळे त्यांच्या आयुष्यात देखील आनंद निर्माण होईल. मैत्रयुवा ही संस्था विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असते. त्यामुळे मैत्रयुवा ही सातत्याने सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.