Pune : सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ताशेरे, ही भाजप’ला चपराक – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा (Pune) निकाल घटनात्मक तरतुदींवर असून (ठाकरे यांच्या) मूळ  शिवसेना पक्षाचा व्हीप वैध असल्याचे स्पष्ट करून, 16 आमदारांवरील कारवाईचे थेट व स्पष्ट संकेत विधानसभा अध्यक्षांना देतांना ‘योग्य वेळेत’ (reasonable time) निर्णय करण्याची अपेक्षा ही विधानसभा अध्यक्षांकडून व्यक्त केली, याचा अर्थ 16  आमदारांवरील कारवाई’चा मुद्दा रद्द होत नाही, असे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या  निकालानंतर केले. 

या निर्णयाने विद्यमान ‘मुख्यमंत्री व मंत्र्यासह 16 आमदारांवरील’ निलंबनाची कार्यवाही टाळता येणार नाही’ हेच स्पष्ट झाले असून  तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी शेड्युल 10 प्रमाणे (पुर्व परिस्थिती गृहीत धरून) अपेक्षीत निलंबनाची संविधानीक कारवाई’ करावी अशीच स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली. याचा अर्थ ‘विद्यमान मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट वा जिवदान’ दिले असा होत नसल्याचे देखील स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या सत्ताबदला’वरील सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे हीच भाजप’ला चपराक असून संविधानभिमुख’ कारभार करण्याची भाजप’ची पात्रता नाही.. हेच सिध्द होत असल्याची प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकालाविषयी चुकीचा अर्थ सांगत जनतेची (Pune) दिशाभूल करत असून सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाचे चुकीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रयत्न करणे एक प्रकारे न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. सत्तेच्या हव्यासा पोटी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान प्रकरणी फडणवीसांची कायद्याची पदवी अडचणीत येऊ शकते असा इशाराही दिला.

Bhosari : वसुलीसाठी आलेल्या रिकव्हरी एजंटला धमकावण्यासाठी गोळीबार

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाने दिलेल्या निकालात राज्यपाल कोशारींच्या असंवैधानिक दुष्कृत्यांवरील प्रखर टीका याचा किमान बोध खरेतर भाजपच्या नेतृत्वाने घेणे व स्वकर्मांचे आत्मचिंतन करणे जास्त गरजेचे असल्याचेही काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.