Pune : हरी नामाच्या गजराने दुमदमले ‘स्वरनाद’

एमपीसी न्यूज : काॅक्लिआ पुणेच्या स्वरनाद केंद्राच्या चिमुकल्या वारकऱ्यांचा (Pune) पालखी सोहळा 28 जून रोजी दिमाखात साजरा करण्यात आला. ‘तुझे नाम ओठी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप सार्‍या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली अशी साद घालत स्वरनादच्या छोट्या कर्णबधिर बालकांनी लेझीमच्या तालावर या सोहळ्यास सुरूवात केली.

विठ्ठलाची भक्तीगीते, नृत्य आणि टाळनाद करत पालखी सोहळ्याचा आनंद सर्वांनी लुटला. अशा कार्यक्रमातून धार्मिक व सांस्कृतिक संस्कार घडवण्याचा प्रयत्न स्वरनाद नेहमीच करत असते. मुलांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते, त्यामुळे काही क्षणातच अवघी पंढरी प्रत्येक्षात अनुभवण्यास मिळाली.

या पालखी सोहळ्यास काॅक्लिआ पुणेच्या खजिनदार तसेच स्वरनादच्या संचालिका रक्षा देशपांडे, स्वरनादच्या मुख्याध्यापिका अभिलाषा अग्निहोत्री, शाळेच्या सर्व शिक्षिका, 60 कर्णबधिर बालके आणि त्यांचे पालक हे सर्व उपस्थित होते. हा सोहळा अतिशय सुरक्षित वातावरणात पार पडला.

यासाठी अलंकार पोलिस चौकीने केलेले सहकार्य मोलाचे होते. त्याप्रमाणे (Pune) हिंगणे बुद्रुक कर्वेनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त शुभम बराटे आणि विशाल तुपे यांचेही सहकार्य लाभले.

Pune : बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान चौकातील वाहतूकीत बदल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.