Maval : श्रीराम विद्यालयाची आषाढी एकादशी निमित्त दिंडी

एमपीसी न्यूज – नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयाच्या (Maval) विद्यार्थ्यांनी आज (गुरुवारी, दि. 29) आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली. या दिंडीने ग्रामप्रदक्षिणा केली.

या दिंडीमध्ये शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश बाजीराव शेटे, सरपंच रामनाथ बधाले, विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपत काशिनाथ कायगुडे व विद्यालयातील सर्व शिक्षक, विनय गायकवाड, अशोक धनोकार, युवराज सोनकांबळे, वैशाली माळी, सुजाता चव्हाण, जयश्री कुलकर्णी, सिमा शेटे, सर्व आयबीटी स्टाफ, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

भजन आणि विठुरायाचा नामघोष करत दिंडीचे प्रस्थान झाले. दिंडीने ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. नंतर विठ्ठल मंदिरात भजन, अभंग, हरीपाठ, विद्यार्थी व शिक्षक यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.

श्रीराम तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जालिंदर शेटे यांनी विद्यार्थ्यांचे (Maval) स्वागत केले. तसेच श्रीराम भजनी मंडळाचे सदस्य यांनी उत्तम भजन सादर केले, विठ्ठलाची महाआरती करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिंडीचा समारोप करण्यात आला. मुख्याध्यापक कायगुडे यांनी आभार मानले.

Pune : हरी नामाच्या गजराने दुमदमले ‘स्वरनाद’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.