Pune : टाटा टेक्नॉलॉजीजने इन्होवेन्ट 2023 चे विजेते घोषित केले, सर्व अंतिम स्पर्धकांना करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या

एमपीसी न्यूज –जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी(Pune ) असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजने इन्होवेन्ट हॅकॅथॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या यशस्वी समारोपाची घोषणा केली आहे.

हे एक नाविन्यपूर्ण व्यासपीठ आहे जे भारतातील तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांची सृजनशीलता प्रदर्शित करण्याची आणि उत्पादन उद्योगासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्याची संधी देते.

ही संकल्पना कंपनीच्या शैक्षणिक योजनेशी संबंधित महत्वपूर्ण (Pune)असा टप्पा आहे आहे, ज्यामुळे भारतातील युवा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आणि सृजनशीलता निर्माण करण्यास मदत होऊ शकते, आणि त्यांना उत्तम करिअर्स घडवण्याकरता साहाय्य करू शकते.

Pune: फिरोदिया करंडक स्पर्धेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, 31 जानेवारी पासून होणार सुरुवात

सर्वोत्कृष्ट 10 संघांनी हिंजवडी, पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजीज मुख्यालयात झालेल्या डेमो डे मध्ये भाग घेतला जिथे त्यांनी त्यांचे नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप्स सादर केले आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. अंतिम मूल्यमापन श्री. वॉरेन हॅरिस, सीईओ आणि एमडी – टाटा टेक्नॉलॉजीज, श्री. रवी अरोरा, वरिष्ठ उपाध्यक्ष व हेड, ग्रुप इनोव्हेशन – टाटा सन्स, श्री. स्वेन पॅटुश्का, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर – टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड, आणि श्री. ज्योतिन कुट्टी सस्ताभवन, चीफ सस्टेनॅबिलिटी ऑफिसर – टाटा मोटर्स यांच्या प्रतिष्ठित परीक्षक मंडळाद्वारे करण्यात आले.

बन्नरी अम्मान इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, इरोड, मधील विजयी संघ रोलेक्सला त्यांच्या नाविन्यपूर्ण ‘जेनेरेटिव्ह एआय फॉर कार डिझाईन – अनलीशिंग क्रिएटिविटी अँड एफिशिएंसी इन ऑटोमोटिव स्टाइलिंग’ इनोव्हेशनसाठी रुपये 3,00,000/- चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

आरवीसीई, बँगलोर, मधील संघाने त्यांच्या इनोव्हेशन ‘डिझाईन अँड डेवलप ऍन ऑटोनोमस इलेक्ट्रिक वेहिकल (एइवी) फॉर इंडियन रोड्स’ साठी दुसऱ्या क्रमांकाचे रुपये 1,00,000/- चे रोख बक्षीस जिंकले. तिसरे बक्षीस 50,000/- रुपये वीआईटी, वेल्लोर, मधील थंडरबोल्ट संघाने त्यांच्या इनोव्हेशन ‘बॅटरी सिस्टिम अँड पम्पिंग स्टेशन फॉर बस यूझिंग वनैडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी’ साठी जिंकले. त्यांच्या प्रतिभेची ओळख त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यात दिसून येते, त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीजने सगळ्या सर्वोत्कृष्ट 10 अंतिम स्पर्धकांना त्यांच्यासोबत करिअर सुरू करण्याची संधी दिली.

टाटा टेक्नॉलॉजीज इन्होवेन्ट सत्कार समारंभात बोलताना, श्री वॉरेन हॅरिस, एमडी आणि सीईओ – टाटा टेक्नॉलॉजीज म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीजचे ‘इंजीनियरिंग ए बेटर वर्ल्ड’ हे उद्दिष्ट आमच्या पर्यावरणीय स्थिरतेसाठी नवनवीन ई-मोबिलिटी सोल्यूशन्स निर्माण करण्याच्या प्रतिबद्धतेचे प्रतिनिधित्व करते, ज्यात आमच्या संपूर्ण इकोसिस्टम समवेत अकॅडेमियादेखील सहभागी असते.

इन्होवेन्ट हॅकॅथॉनसाठी प्रकल्प आमंत्रित करताना आम्ही प्रत्यक्ष जगातील काही आव्हाने विचारात घेतली आणि इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्सनी या समस्यांसाठी जे नाविन्यपूर्ण आणि कमी खर्चिक उपाय योजले, ते फार प्रेरणादायी होते. याकरता मी सर्व विजेत्यांचे आणि सहभागींचे अभिनंदन करतो ज्यांनी अशी सृजनशील प्रतिभा आणि समस्यांचे नाविन्यपूर्ण समाधान करण्याकरता आवश्यक असा ‘कॅन-डू अटिट्यूड’ दाखवला.”

तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संस्कृती तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, श्री संतोष सिंह, ईव्हीपी आणि ग्लोबल हेड, मार्केटिंग आणि बिझनेस एक्सिलेन्स – टाटा टेक्नॉलॉजीज म्हणाले, “एक मानवी ब्रँड म्हणून, आम्ही आमच्या ग्राहकांना भेडसावणाऱ्या व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्याकरता आवश्यक असे नवनवीन उपाय आणि उत्तम अनुभव देण्यावर भर देतो.

आधुनिक काळातील विद्यार्थी पुढील काही वर्षांत काही सर्वात मोठे उपाय शोधतील. या तरुण अभियांत्रिकी मनांना पाठिंबा देणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांना सक्षम करणे, त्यांना यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या तरुण नवोदितांनी दाखवलेला उत्साह आणि सर्जनशीलता आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे, आणि त्यांनी उत्तम जगाची निर्मिती करण्याच्या आमच्या विश्वासात आणखी भर टाकली आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही विजेत्यांना फक्त रोख बक्षिसे आणि ज्ञानच नव्हे तर सर्व अंतिम स्पर्धकांना नोकरीच्या संधीही देऊ शकलो.”

टाटा टेक्नॉलॉजीज विजेत्या संघांचे हार्दिक अभिनंदन करते आणि इन्होवेन्ट हॅकॅथॉनच्या अभूतपूर्व यशासाठी सर्व सहभागींचे त्यांच्या असाधारण योगदान आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करते. इन्होवेन्ट कार्यक्रमाची अधिक माहिती https://www.tatatechnologies.com/innovent वर उपलब्ध आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.