Pune: फिरोदिया करंडक स्पर्धेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, 31 जानेवारी पासून होणार सुरुवात

एमपीसी न्यूज – फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध(Pune) गुणदर्शन स्पर्धा यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. 31 जानेवारी पासून या स्पर्धेच्या पूर्वप्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे.  

स्पर्धेचे संयोजक असलेल्या सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमीचे अजिंक्य कुलकर्णी म्हणाले, की यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या फिरोदिया करंडक स्पर्धेची पूर्वप्राथमिक फेरी 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

तर 14 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत प्राथमिक फेरी, 24 आणि 25 फेब्रुवारीला अंतिम फेरी होणार आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने 2 आणि 3 मार्चला फिरोदिया करंडक स्पर्धेतील कलाकारांचा मेळावा होणार आहे.
त्यावेळी जुन्या पिढीच्या, नव्या पिढीच्या (Pune)कलाकारांचे सादरीकरण होणार आहेत. त्याच दिवशी स्पर्धेचा 50 वर्षांचा प्रवास उलडणारा माहितीपट आणि स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याशिवाय पन्नास वर्षांतील निवडक 50 कलाकारांच्या मुलाखती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
Maval: राष्ट्राच्या उभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्वपूर्ण योगदान – यादवेंद्र खळदेसूर्यकांत कुलकर्णी यांनी 1974 मध्ये फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धा सुरू केली. फिरोदिया या उद्योजक कुटुंबाकडून या स्पर्धेसाठी पाठबळ मिळाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे ही स्पर्धा रूजत गेली.

नाट्य, संगीत, कविता या पासून ते दोरीवरच्या कसरतींपर्यंत अशा विविध कलाप्रकार फिरोदिया करंडक स्पर्धेच्या मंचावर येतात. वेगवेगळ्या कलाप्रकारांना एका संकल्पनेत गुंफून त्याचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाते.
त्यामुळे पारंपरिक एकांकिका स्पर्धांपेक्षा अत्यंत वेगळी ओळख फिरोदिया करंडक स्पर्धेने प्राप्त केली आहे. रंगमंचावरचा सिनेमा असे या स्पर्धेचे वर्णन केले जाते. गेल्या पन्नास वर्षांत फिरोदिया करंडक स्पर्धेने अभिनेते, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे फिरोदिया करंडक स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.