TDR : करोडो रुपयांचा टीडीआर घोटाळा झाला असतानाही पालकमंत्री अजित पवार यांच्या डोळ्यावर पट्टी – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – पालकमंत्री अजित पवार जिल्हा चालवत (TDR)आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत कराेडाे रूपयांचा भ्रष्टाचार हाेत असताना ते आंधळ्यासारखी डाेळ्यावर पट्टी बांधून बसलेत का, हा माझा सवाल आहे.

महापालिकेत दीड हजार काेटी रूपयांचा टीडीआर घाेटाळा हाेत असेल आणि पालकमंत्री त्यामध्ये पाणी मुरत असल्याचे सांगत आहेत. मग तुम्ही कसले पालकमंत्री आहात, असा  सवाल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रविवारी पिंपरी-चिंचवड (TDR)दौऱ्यावर आहेत. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मावळचे संघटक संजोग वाघेरे, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, माजी नगरसेविका मीनल यादव यावेळी उपस्थित होते.

एकनाथ पवार म्हणाले की, पुढचे 30 वर्षांसाठी शिवसेनेला चांगले दिवस येणार आहेत. मावळचा खासदार उद्धव ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक होणार आहे. महापालिकेतही आमचीच सत्ता येणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहे. शिरूरचा खासदारही महाविकास आघाडीचाच होणार आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातून  महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील.

Pune: फिरोदिया करंडक स्पर्धेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, 31 जानेवारी पासून होणार सुरुवात

टीडीआर घोटाळा होत आहे. महापालिकेत करोडो रुपयांचा घोटाळा होत असताना पालकमंत्री अजित पवार डोळ्यावर पट्टी लावून बसले आहेत का, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असताना पालकमंत्री गप्प का आहेत. अनेकजण रांगेत आहेत, नजीकच्या काळात पक्ष प्रवेश होतील. आता सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले.

चाबुकस्वार म्हणाले की, शिवसेना ज्या पद्धतीने फोडली. जो निकाल विधानसभा अध्यक्ष यांनी दिला आहे. त्याचा पर्दाफाश केला जाणार आहे. जनतेच्या दरबारात जाऊन निकालाची चिरफाड केली जाणार आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपच्या हुकुमशाही विरोधात शिवसेना लढत आहे. ‘महा न्याय, महानिष्ठा’ सभा होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.