Pune: गावठाण आणि पेठांमध्ये प्रीमियमची रक्कम ठरवून निर्णय घेतल्यापासून एकही फाईल अंतिम मान्यता मिळवून फायदा झालेला नाही ; माजी नगरसेवकांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील गावठाण आणि पेठांमध्ये प्रीमियमची रक्कम (Pune)ठरवून आपण जो निर्णय घेतला त्यामध्ये निर्णय घेतल्यापासून एकही फाईल अंतिम मान्यता मिळवून फायदा झालेला नाही, अशी माहिती माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी दिली. यासंदर्भातील निवेदन आज पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. 
या फाईलचा प्रवास आणि त्यामुळे याला वेळ लागतो.

ही फाईल आयुक्तांकडे येण्यासाठी प्रथम पेठ निरीक्षकाच्या (Pune)सहाय्यकाकडनं निवेदन लिहून घ्यावे लागते. त्यानंतर बांधकाम निरीक्षक, त्यानंतर उपअभियंता, त्यानंतर कार्यकारी अभियंता, त्यानंतर अधीक्षक अभियंता, नगर अभियंता त्यांची सही झाली की, पुन्हा सावरकर भवन येथे आवक नोंदीसाठी,  त्यानंतर दक्षता विभागाकडे, दक्षता विभागाकडून  अतिरिक्त आयुक्त जनरल यांच्याकडे, त्यांच्याकडून आयुक्तांकडे पुन्हा या फाईलचा उलटा प्रवास सुरू होतो.  या सगळ्या कालावधीमध्ये तीन साडेतीन महिन्याचा कालावधी निघून जातो.

 

“Ease of doing business”
यासाठी सरकार विविध योजना विविध सवलती देत असतं. आपल्या महापालिकेत क्लिष्टता कमी होणे गरजेचे आहे. या कार्यपद्धतीमध्ये बदल करून आपले अधिकार अधीक्षक अभियंता बांधकाम परवाना यांच्याकडे दिले, तर कामांमध्ये सुसूत्रता आणि वेळ कमी लागेल. या बाबीचा विचार करून निर्णय करावा, अशी मागणी या माजी नगरसेवकांनी निवेदनात केली आहे ही विनंती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.