Vadgaon Maval : 22 जानेवारी रोजी वडगाव शहरातील मद्य,मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची राष्ट्रवादीची मागणी

एमपीसी न्यूज – आयोध्या येथे 22 जानेवारी रोजी (Vadgaon Maval )राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरातील मांस आणि मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

यावेळी राजेश बाफना,अतुल राऊत, विशाल वहिले,बारकू ढोरे,आफताब सय्यद,सोमनाथ धोंगडे,अनिल ओव्हाळ,बाळासाहेब शिंदे,पंकज भामरे,विशाल सुराणा,पप्पू सोळंकी, राहील तांबोळी आदी उपस्थित होते.

प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना दिवशी मांसाहार(Vadgaon Maval ) विक्री व मद्य विक्री वडगाव शहरात बंद ठेवणे बाबत वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम व वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब यांना वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मिञ पक्ष यांच्या वतीने दिले निवेदन देण्यात आले.

अखंड भारतीयांचे आराध्य दैवत तीर्थक्षेत्र आयोध्या येथे 500 वर्षानंतर सुवर्णक्षण “प्रभू श्रीराम मूर्तीची” प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे, मोठ्या भक्ती भावाने प्रभू रामांची प्रतिष्ठापना होत असताना याची देही याची डोळा हा सुखद सोहळा स्वर्गी कुठे नाही.

वडगाव शहरातील व परिसरातील भागात प्रतिष्ठापनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहार विक्री व मद्य विक्री होऊ नये सदर दुकानदार बंधूंना नगरपंचायत मार्फत व पोलीस स्टेशन मार्फत बंद ठेवण्यास विनंती करावी अशा आशयाचे निवेदन वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.