Pune : कंत्राटी कामगार हा कुटुंब व्यवस्था उध्वस्त करण्याचा सरकारी उपाय : विभागीय प्रतिनिधी मार्गदर्शन सभेतील सूर

एमपीसी न्यूज – कंत्राटी कामगार हा केवळ औद्योगिक (Pune)प्रश्न नसून सामाजिक शांतता आणि कुटुंब व्यवस्था उध्वस्त करण्याचा सरकारी उपाय आहे. कायदे सुधारणेच्या नावाखाली देशात व महाराष्ट्रात सुरू असलेली कामगारांची गळचेपी हा हळूहळू विष देऊन मारण्यासारखा प्रकार आहे.

गेल्या दहा वर्षात कामगार कायद्यात केले जाणारे बदल हे (Pune)अश्या पद्धतीने केल्या जात आहेत की कोणत्याही कामगाराला त्यांच्या सोबत काय होत आहे हे कळायला अवघड आहे. या मुद्द्याला धरून भारतीय कामगार सेना, शिवसेना उपनेते प्रदेश सरचिटणीस डॉ.रघुनाथ कुचिक, प्रख्यात मनुष्यबळ विकास संशोधक, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, लेखिका डॉ.वृषाली राऊत व प्रा. नासिर शैख यांनी सविस्तर मुद्दे मांडलेत.

Pune: फिरोदिया करंडक स्पर्धेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, 31 जानेवारी पासून होणार सुरुवात

भारतीय कामगार सेना, शिवसेनेतर्फे आज पुणे येथे “सुरक्षित श्रमधिकार व कंत्राटी धोरण” आणि रोजगार हक्काचा” या विषयावर विभागीय प्रतिनिधि मार्गदर्शन सभा संपन्न झाली. संघटित व असंघटित कामगार प्रतिनिधिसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेला वेगवेगळ्या क्षेत्रातील350पेक्षा जास्त कामगार प्रतिनिधींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपस्थित मान्यवरांनी हे बदल येणार्‍या काळात किती जीवघेणे ठरतील हे आकडेवारी सकट समजावून सांगितले. कामगारांच्या आत्महत्या या शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या तुलनेने कैक पटीने जास्त असून कामगार गेल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. कंत्राटी पद्धत ही लोकशाही मूल्यांच्या विरुद्ध असून ती आधुनिक गुलामगिरी आहे व त्यामुळे कामगारांची आर्थिक, शारीरिक, व सामाजिक पिळवणूक होते, तिला पाठिंबा देणे म्हणजे कामगारांच्या हक्काची पायमल्ली आहे, असा सभेतील सूर उमटला. या सभेचे संचालन अनिल जगताप यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.