Pune : प्रथम अध्याय निरुपण सोहळा समारोप संपन्न

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Pune) व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्रीमद् गणेश गीता प्रथम अध्याय निरुपण सोहळ्याचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेमध्ये करण्यात आले होते. निरुपणाच्या शेवटच्या दिवशी समारोपप्रसंगी ते बोलत होते.

Pune : ‘फ्रीमेसनरी’ या संघटनेबद्दल धूसरता कमी करण्यासाठी ‘ओपन हाऊस’चे आयोजन

स्वानंद पुंड शास्त्री म्हणाले, काम, क्रोध, द्वेष, मत्सर, मद, मोह हे दुःखास कारणीभूत आहेत. पण, सर्वांच्या आधी ममत्व आणि अहंकार येतो. मी आणि माझे या बंधातून जो सुटला तो मुक्त आहे. अहम आणि ममत्व कमी केले, तर अहंकार कमी होईल. ममत्व कमी करा म्हणजे कारुण्य कमी करा असे नाही.

ममत्व आणि अहंकार या दोन शब्दांच्या भोवती जगातील सर्व दुःख आहे. प्रत्येक घर मंदिर व्हायला हवे. घरात फक्त देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवली म्हणजे मंदिर होत नाही. त्याच्या समोर उपासना, आराधना व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.