Pune : पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पतीला अवघ्या पाच तासात केले जेरबंद, वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज –  पत्नीचा खून करून फरार होऊ पाहणाऱ्या ( Pune)  पतीला वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या पाच तासाच सोलापूर-पुणे महामार्गावरून अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) कर्वेनगर येथे घडली होती.

लखन बालाजी कांबळे (रा.हिंगणे कॉलनी, कर्वेनगर,मूळ रा. उस्मानाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Chinchwad : शहर पोलीस दलातील दोन निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात फरशी व कुऱ्हाडीने वार करत मंगळवारी राहत्या घरी खून केला होता. त्यानंतर तो त्याच्या मोपेड गाडीवरून मूळ गावी उस्मानाबाद येथे पळून जात होता. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत आरोपीच्या शोधासाठी तपासी पथके रवाना केली. यावेळी आरोपी त्याच्या गावी जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तात्काळ एक पथक आरोपीच्या मागावर रवाना केले. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी महामार्गावर विरुद्ध दिशेने पुण्याकडे येवू लागला. यावेळी पोलिसांनी पुढे जाऊन त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी तेथेच टाकून पायी धावू लागला. पोलिसांनी देखील पायी धावत जाऊन त्याला ताब्यात घेतले. वारजे माळवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे हलवून अगदी गुन्हा दाखल होत असतानाच आरोपीला जेरबंद केले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चारीत्र्याच्या संशयावरून खून केल्याचे कबुल केले.

ही कामगिरी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक  नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस अमंलदार प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अमोल सुतकर यांनी ( Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.