Pune :  यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींची 1 कोटी 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी चांगले ( Pune ) कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाlची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा  प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी शुलभ नांगर (वय 34, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली असून सायबर ( Pune )पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला.

त्यांनी यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर यांना सुरवातीला एक हजार 350 रुपये कमिशनही दिले.

त्यानंतर टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी 49 लाख 68 हजार रुपये घेतले. परंतु त्यापोटी काही मोबदला दिला नाही.

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नांगर यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत सायबर पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ॲपधारकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Today’s Horoscope 27 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

अशाच आणखी एका घटनेत टेलिग्राम, व्हॉटसॲप आणि इ-मेलच्या माध्यमातून ‘टास्क जॉब’द्वारे पैशांचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मुफ्फदल महम्मद (वय 48, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी फिर्याद ( Pune )  दिली आहे. त्यावरून सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 सप्टेंबर ते 3ऑक्टोबरदरम्यान घडला.

चांगले कमिशन देण्याचे आमिष आरोपींनी महम्मद यांचा विश्वास संपादन करून टास्क दिले. त्यासाठी चार्जेसच्या नावाखाली वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये 70 लाख 32 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु त्याचा मोबदला न देता फसवणूक केली.

यू ट्यूबला सबस्क्राइब, लाइक करणे तसेच टेलिग्राम, व्हॉटसॲप आणि इ-मेलच्या माध्यमातून ‘टास्क जॉब’द्वारे पैशांचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकारे सबस्क्राइब आणि लाइक करून पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी ( Pune ) केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.