Pune : उद्या पुण्यातील लष्कर पाणीपुरवठा केंद्र परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – मुख्य जलनलिके वरील देखभाल दुरुस्तीच्या ( Pune) कामामुळे उद्या म्हणजे बुधवारी (दि.19) लष्कर पाणीपुरवठा पाणीपुरवठा केंद्रा अंतर्गत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यात रामटेकडी मुख्य जलनलिके वरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने लष्कर पंपिंग रामटेकडी टाकीवरील अखत्यारीतील भागाचा पुर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग 

लष्कर जलकेंद्र भाग :- संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन

पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड दाबी बाजू मांडी बी.टी. रोड, भीमनगर, बालाजी नगर विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरियंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर, मंतरवाडी.

तसेच गुरुवारी (दि.20) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची ( Pune)शक्यता आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.