Pimpri News : कठोर मेहनत,एकाग्रता आणि सुनियोजित पद्धतीने केलेला अभ्यास यशाला गवसणी घालू शकतो – कुलदीप रामटेके

एमपीसी न्यूज – यश म्हणजे सर्व अपयशाचे दरवाजे बंद (Pimpri News) करणे होय. कठोर मेहनत,एकाग्रता आणि सुनियोजित पद्धतीने केलेला अभ्यास यशाला सहज गवसणी घालू शकतो. कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचे असेल तर त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करून सम्यक मार्गाचा अवलंब करत प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध धम्माचे अभ्यासक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनिअर्स असोसिएशन(बाणाई)चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप रामटेके यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विचार प्रबोधन पर्वाअंतर्गत महापालिका व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व युवतींकरता रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरामध्ये व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून अलौकिक ज्ञान प्राप्ती, स्पर्धा परीक्षांची तयारी, उद्योजकता विकास कौशल्य केंद्रांची माहिती, लेखी परीक्षा व मुलाखती याबाबत कुलदीप रामटेके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

Pune : उद्या पुण्यातील लष्कर पाणीपुरवठा केंद्र परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक ज्योत सोनवणे,शर्मिला काराबळे, बाणाईचे शहराध्यक्ष विजय कांबळे, चंद्रकांत पाटील, निवृत्त सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता शरद जाधव,अनिल सूर्यवंशी, बाणाईचे प्रकाश दामोदरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते.

तथागत बुद्धाने केलेली ज्ञान प्राप्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेला अभ्यास या विचारातून मुलांनी कसा अभ्यास करावा, भौतिक ज्ञान सामान्य ज्ञान कसे प्राप्त करावे याबाबत रामटेके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दि. 21एप्रिल रोजी मोरवाडी येथील महापालिकेच्या आयटीआय मध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्यामध्ये सर्व युवक युवतींनी सहभाग (Pimpri News) घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.