PMPMl : विमाननगर, बाणेरगांव व भोसरी परिसरातून नव्याने पीएमपीएल बस सेवा होणार सुरु

एमपीसी न्यूज – वाढत्या प्रवासी संख्येनुसार पीएमपीएमएल (PMPMl ) तर्फे आजपासून (मंगळवार) नव्याने तीन मार्गावर नव्याने बस सेवा सुरु होणार आहे. यामध्ये  विमाननगर, बाणेर गाव व भोसरी या परिसराचा समावेश असणार आहे.

Chinchwad : सप्ताह स्वरूपात महावीर जन्म कल्याण कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा

विद्यार्थी, कामगार व प्रवाशांच्या सोयीचा विचार करता गर्दीच्यावेळी हि बससेवा पुरवण्यात येणार आहे.

या बसेबस पुढीलप्रमाणे असतील   –

(मार्ग पासून – पर्यंत मार्गे)

 

1)  179 विमाननगर ते हडपसर खराडी बायपास, मुंढवा, (मगरपट्टा)

2) 255 विमाननगर ते हिंजवडी माण फेज 3 पुणे स्टेशन, मनपा भवन, औंधगांव

3)  258 मनपा भवन ते बाणेरगांव (राधा चौक) मोहन नगर, ननावरे नगर, पॅनकार्ड क्लब

 

या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे, तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर आणखी बसेस वाढविण्यात येतील असेही पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

उद्या पासून भोसरी ते देहुगाव मार्गही होणार सुरु

वरील तीन मार्गाबरोबरच उद्या म्हणजे बुधवारपासून (दि.19) भोसरीगांव ते देहूगांव हा बसमार्ग होणार सुरुमार्ग क्र. 356 भोसरीगांव ते देहूगांव हा बसमार्ग प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात येणार असून हा मार्ग मोशी, बोराडेवाडी, चिखली, तळवडे (PMPMl ) असा संचलनात राहणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.