Chinchwad : सप्ताह स्वरूपात महावीर जन्म कल्याण कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज –  जैन सोशल ग्रुप डायमंड या पिंपरी चिंचवड (Chinchwad ) शाखेच्या वतीने भगवान महावीर जयंती यांचे औचित्य साधून कामशेत ते चिंचवड अहिंसा दौड संपन्न झाली. सभासदांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला.

सप्ताह निमित्त मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. सायली पवार व डॉ. विजय पवार यांनी तपासणी केली मोफत औषध वाटण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ‘प्रभू महावीर जन्म कल्याण’ नाटिका सादर करण्यात आली. त्यात जैन सोशल ग्रुप डायमंड मधील 75 हून अधिक हौशी कलाकारांनी सहभाग नोंदविला.

PCMC : आयुक्तांच्या नोटीसीला सहशहर अभियंत्याचे उत्तर, म्हणाले…

नाटकाचे लेखन व संयोजन डॉ. क्षितीजा गांधी यांनी केले. महावीर जयंती निमित्त आयोजित सप्ताहाचे डायमंड गु्रपचे अध्यक्ष प्रशांत गांधी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सप्ताहानिमित्त पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आदी भागातील जैन संघटनेतील पदाधिकारी व सभासदांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रमासाठी जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष प्रशांत गांधी, पदाधिकारी राजेंद्र धोका, दिलीप मेहता, हसमुख जैन, दिलीप चोरबेले, युवराज शाह, चंचला कुचेरिया, सौरभ शहा, धवल पटेल, कमलेश चोपडा, सुनिता धोका आदींनी विशेष परिश्रम (Chinchwad ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.